पाकिस्तानकडून रासायनिक शस्त्रांचा वापर

0

नवी दिल्ली : संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी केलेल्या एका वक्तव्यामुळे संपुर्ण देशात आश्‍चर्य व्यक्त होत आहे. पर्रिकर म्हणाले एका रिपोर्टनुसार संरक्षण खात्याला अशी माहिती उपलब्ध झाली आहे की, अफगानिस्तानला लागून असलेल्या सीमा भागात पाकिस्तानने ज्या शस्त्रांचा वापर केला आहे, त्यामध्ये राससायनिक शस्त्रांचाही वापर झाल्याची शक्यता आहे.

नागरिकांच्या शरीरावर परिणाम
एएनआयने केलेल्या एका ट्विटनुसार डीआरडीओच्या एका कार्यक्रमात संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर म्हणाले की, अफगानिस्तान आणि अन्य उत्तर भागातून असे अनेक रिपोर्ट येत आहेत की, तेथील स्थानिक लोकांच्या अंगावर चट्टे उटले आहेत. त्यांच्या शरीरावर रासायनिक शस्त्रांचा गंभीर परिणाम झाल्यासारखे दिसत आहे. या प्रकाराचे फोटो पाहिले असता ते विचलीत करणारे होते, असे पर्रिकर म्हणाले.

कोणत्याही युध्दासाठी तयार राहावे लागेल
पर्रिकर असेही म्हणाले की, आता लगेचच अशा प्रकारच्या घटनांबद्दल ठामपणे सांगता येणार नाही. परंतू देशाला कोणत्याही प्रकारच्या युध्दासाठी तयार राहिले पाहिजे. देशाला अणु, रासायनिक किंवा जैविक हल्ल्याचा धोका असो अथवा नसो, पण देश कोणत्याही परिस्थितीशी सामना करण्यासाठी तयार आहे.

सावध राहणे गरजेचे
पाकिस्तानकडून भारताला नेहमीच धोका राहीला आहे. आतापर्यंत भारताच्या जमीनीवर पाकिस्तानने तीन वेळा हल्ला केला आहे. यामुळे रासायनिक हल्ल्याचा संशय गंभीरपणे घ्यायला लागणार आहे. तसेच कोणत्याही स्थितीशी सामना करण्याची तयारी भारताला ठेवावी लागणार आहे.