पाकिस्तानकडून एलओसीवर शस्त्रसंधीचे उल्लंघन: एक जवान शहीद

0

नौशारा: पाकिस्तानकडून सीमा रेषेवर वारंवार कुरापती सुरू आहे. शस्त्रसंधीचे उल्लंघन व घुसखोरी करण्याचा पाकिस्ताकडून प्रयत्न होत असतो. रविवारी ३० ऑगस्ट रोजी देखील पाकिस्तानी सैन्याकडून सीमा रेषेवरील जम्मू-काश्मीरमधील नौशारा सेक्टरमध्ये शस्त्रसंधीचे उल्लंघन करत गोळीबार करण्यात आला. यास भारतीय जवानांनी देखील सडेतोड प्रत्युत्तर दिले. मात्र, यावेळी झालेल्या गोळीबारात भारतीय सैन्य दलातील नायब सुभेदार राजविंदर सिंग हे शहीद झाले.

पाकिस्तानी सैन्याशी लढत असताना नायब सुभेदार राजविंदर सिंग गंभीर जखमी झाले होते. उपचारा दरम्यान ते शहीद झाले. भारतीय लष्कराचे पीआरओ लेफ्टनंट कर्नल देवेंद्र आनंद यांनी याबाबत माहिती दिली. नायब सुभेदार राजविंदर सिंग हे अतिशय शूर व देशाच्या रक्षणासाठी समर्पित असे सैनिक असल्याचे सांगण्यात आले.

काल रात्री उशिरा श्रीनगरमधील पंथा चौक परिसरात जवान आणि दहशतवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन दहशतवाद्यांचा खात्मा करण्यात जवानांना यश आले आहे. तर, त्या ठिकाणी देखील एक पोलीस अधिकारी शहीद झाला आहे. काल रात्रीपासून या परिसरात चकमकीस सुरूवात झाली होती.

Copy