पाककडून सीमेवर गोळीबार

0

नई दिल्ली : होळीच्या सणादरम्यानही पाकच्या नापाक कारवाया सुरूच होत्या. पाकिस्तानी सैनिकांनी चोवीस तासात दोन वेळा युध्दबंदीचे उल्लंघन केले. सोमवारी पुंछ जिल्ह्याच्या सीमेवर मोर्टारचा मारा करण्यात आला तसेच गोळीबारही करण्यात आला. पाकिस्तानच्या या कारवायांना भारतीय सैनिकांनीही तोडीसतोड उत्तर दिले.

पुंछ सेक्टरमध्ये सोमवारी सकाळी 6.40 वाजता पाकिस्तानी सैन्याने युध्दबंदीचे उल्लंघन केले. भारतीय सैनिकांनीही यावेळी जोरदार प्रत्युत्तर दिले. दोन्ही बाजूने दिवसभर अधूनमधून गोळीबार सुरूच होता. रविवारी पुंछमधील कृष्णा खोर्‍यात 12 वाजता पाकिस्तानकडून मोर्टारचा हल्ला करण्यात आला होता. त्यानंतर सोमवारीही मोर्टारचा मारा व गोळीबार करण्यात आला.