पांजरापोळ संस्थानमध्ये दशक्रियाविधीवरही निर्बंध

0

कुटुंबातील फक्त तीनच जणांना प्रवेश

जळगाव: शहरातील पांजरापोळ येथे दशक्रियाविधी केला जातो. मात्र कोरोना विषाणूमुळे निर्बंध लावण्यात आले आहे. गर्दी टाळण्यासाठी याठिकाणी एकावेळी एकाच कुटुंबियांना दशक्रियाविधी करता येणार आहे.तसेच तीन पेक्षा अधिक जणांना मज्जाव करण्यात आला असल्याची माहिती व्यवस्थापक सुनील सोनार यांनी दिली.

कोरोन विषाणूचे थैमान राज्यभर पसरल्या सुरुवात झाल्याच्या पार्श्वभूमीवर जिल्हाधिकार्‍यांनी जळगाव जिल्हा लॉकडाऊनचे आदेश दिले आहेत.यानुसार हॉटेल्स , दुकाने , शाळा ,कॉलेज व इतर गर्दीची ठिकाण बंद करण्यात आली आहेत. यामुळे एखाद्या घरात कोणाचे निधन झाल्यास अंत्यविधीचे काय ?असा प्रश्न साहजिकच सर्वसामन्य जनतेला पडतो. अंत्यविधीसाठी लागणारे साहित्य विक्रीचे दुकाने सुरु आहेत.

फोन केल्यावर अंत्यविधीसाठी लाकडे उपलब्ध

जिल्हाधिकार्‍यांच्या आदेशानुसार सोमवारपासून शहरातील जीवनावश्यक वस्तूशिवाय सर्वच वस्तू विक्रेत्यांना आपआपली दुकाने बंद ठेवण्याचा आदेश देण्यात आला आहे. याच पार्श्वभूमीवर शहरातील सर्व दुकाने व वखारी बंद आहेत. पण जर अंत्यसंस्कारासाठी लाकडांची गरज असल्यास तत्काळ त्याची सोय वखार मालकांकडून करण्यात येत आहे. यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांना बळी पडू नये असे संजय पाटील यांनी सांगितले.

कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर मातोश्री आनंदाश्रमात बाहेरच्या लोकांना मज्जाव

सध्या सर्वत्र कोरोना वायरस चा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासन स्तरावर विविध प्रयत्न केले जात असतांना केशवस्मृती प्रतिष्ठान संचलित, मातोश्री आनंदाश्रम येथे ज्येष्ठ नागरिकांना कोरोना व्हायरसची लागण होऊ नये म्हणून पुढील सुचना देईपर्यंत बंधन घालण्याचे संचालक मंडळाने ठरविले आहे. आश्रमातील ज्येष्ठांची योग्य प्रकारे काळजी घेतली जात असून दैनंदिन गरजा पुरवण्यासाठी लागणार्‍या सर्व वस्तू पुरेशा प्रमाणात आहेत. कृपया नागरिकांनी समक्ष येऊन भेटण्याचा आग्रह धरू नये. ज्येष्ठांच्या नातेवाईकांनाही न येण्याची सुचना केली आहे. ज्येष्ठांना कोणत्याही कारणास्तव (अत्यंत जरुरीची वैद्यकीय मदत सोडून ) बाहेर जाण्यास परवानगी दिली जात नाही. अधिक माहितीसाठी संपर्क साधण्याचे
आवाहन करण्यात आले आहे.

Copy