पहूर येथे 30 हजाराच्या रोकडसह दागीने लंपास

0

पहूर -पहूर -कसबे येथील लोहारा रस्त्यावरील भरवस्तीत अज्ञात चोरट्यांनी घरातील तीसहजार रूपयांच्या रोख रकमेसह तीस भार चांदीच्या पाटल्या लंपास केल्याची घटना शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली. लोहारा रस्त्यावर राहणाऱ्या रवींद्र लक्ष्मण गोरे यांच्या राहत्या घरात चोरटयांनी घराच्या पुढील दरवाजाने प्रवेश करून कपाटात ठेवलेले तीस हजार रुपयांची रोकड व तीस भार चांदीच्या पाटल्यांसह पोबारा केला . रवींद्र गोरे हे आपल्या कूटूंबासह रात्री झोपलेले होते . मात्र चोरट्यांनी कुठलाही सुगावा न लागू देता कपाटातील सामान , कपडे अस्ताव्यस्त फेकून पलायन केले . सकाळी रविंद्र गोरे यांना चोरी झाल्याचे समजले . त्यांनी पोलीसांना माहीती देताच घटनास्थळी पोलीसांनी भेट दिली .दरम्यान गोरे यांनी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली असून तपास सहाय्यक फौजदार अनिल अहीरे करीत आहेत .

गस्त वाढविण्याची मागणी -रात्रीच्या वेळेला पोलीसांनी गावात गस्त वाढवून चोरीच्या घटनांना आळा बसविण्याची मागणी ग्रामस्थ करीत आहेत. वाकोद , फत्तेपूर , चिलगांव , पाळधी आदी ग्रामीण भागात पोलीस दारू अड्डे उद्ध्वस्त करीत आहेत ,मात्र पहूरमध्ये राजरोस सुरू असलेले अवैध धंदे कधी बंद होणार ? असा प्रश्न ग्रामस्थ विचारीत आहेत .

Copy