पहूर येथे मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय

0

आठवडे बाजारात तब्बल आठ मोबाईल चोरी , ऐपीआय साहेबांनी लक्ष देण्याची गरज
पहूर – पहूर पेठ येथील आठवडे बाजारात मोबाईल चोरी करणारी टोळी सक्रिय आज तब्बल आठ मोबाईल गेले चोरी गेले .याबाबत सविस्तर वृत्त असे की, आज रविवार पहूर येथील आठवडे बाजारात ऐन सायंकाळी गर्दी पडत असल्याने त्या गर्दीचा फायदा घेऊन मोबाईल फोन चोरी करणाऱ्या टोळी यांनी तब्बल आठ मोबाईल चोरी गेल्याचे निदर्शनास आले आहे. दिवसेंदिवस आठवडे बाजारात चोरी चे प्रमाणात वाढ होत असून या चोरांचा छडा लावण्यात पोलिसांना अपयशच आले आहे.

आठवडे बाजारात पोलीस बंदोबस्त
आज पहूर पेठ येथील आठवडे बाजारात तब्बल पाच पोलीस बंदोबस्तासाठी होते. तरीही अशोक ओंकार बारी, रा. पहूर पेठ, रवींद्र तेजराव काळे ,रा. शिवना,शाहरुख शेख अय्युब शेख, रा.पहूर,दिनेश शालीग्राम पाटील, रा.भराडी या चार जणांनी पहूर पेठ येथील आठवडे बाजारात मोबाईल हरवल्याची तक्रार पहूर पोलीसात दिली असुन अन्य चार जणांचे असे एकूण आठ मोबाईल चोरी गेल्याचे बोलल्या जात आहे.मोबाईल चोरी करणाऱ्या टोळीचा स्वत: हा ऐपीआय शिरसाठ साहेबांनी लक्ष घालून या टोळीचा पर्दाफाश करावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे. दिवसेंदिवस बाजारात चोरिचे प्रमाणात वाढ होत असून बाजारात दुकान लावणारे व्यावसायिक भयभीत झाले आहे.

Copy