पहूर, चाळीसगाव येथे महात्मा बसवेश्‍वर महाराज यांना अभिवादन

0

चाळीसगाव । येथील लिंगायत सेवा संघाच्या वतीने जगत ज्योती समता नायक लिंगायत धर्म संस्थापक महात्मा बसवेश्वर जयंती यांची 886 वी जयंती उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नगराध्यक्षा आशालता चव्हाण व नगरसेवक रामचंद्रभाऊ जाधव, संगीता गवळी, अलका गवळी, विजयाताई पवार, सोमसिंग राजपूत, चंदुभाऊ तायडे तसेच प्रा.रमेश आवटे प्रा.किसन सूर्यवंशी, लिंगायत गवळी पंच अंनाप्पा चिपडे, सखाराम लगडे, अण्णा चिपडे यांच्यासह शेकडो लिंगायत बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते प्रा.किशन सूर्यवंशी, संगीता गवळी, रामचंद्रभाऊ जाधव यांनी महात्मा बसवेश्वरांच्या विचारांची माहिती दिली शेवटी प्रा.रमेश आवटे आभार मानले तर विजय गवळी, विजय लगडे, किशोर गवळी, अशोक कडिखाऊ, राजेंद्र काले, नारायण देवर्षी, संदीप उदीकर, प्रकाश जोमीवले, आव्देश गवळी यांनी परीश्रम घेतले.

महात्मा बसवेश्‍वर हे सर्व धर्माचे – योगेश लाठे
पहुर । पहुर पेठ येथील ग्रामपंचायत हॉलमध्ये महात्मा बसवेश्‍वर महाराज अभीवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी माजी जि.प. सदस्य राजधर पांढरे हे होते. सर्व प्रथम उपस्थित मान्यवरांचे हस्ते महात्मा बसवेश्‍वर महाराज भगवान परशुराम महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी पहूर येथील रमेश माहोरे यांची ग्रा.पं. कार्यालयात महात्मा बसवेश्‍वर महाराज यांची प्रतिमा दिली. महात्मा बसवेश्‍वर महाराज हे फक्त लिंगायताचे नसून सर्व धर्माचे असल्याचे योगेश लाठे यांनी बोलतांना सांगितले. यावेळी सरपंच प्रदीप लोढा, धनगर समाज संघर्ष समिती उत्तर महाराष्ट्र प्रमुख रामेश्‍वर पाटील, विकासो चेअरमन अ‍ॅड. संजय पाटील, माजी पो.पा. विश्‍वनाथ वानखेडे, बाबुराव घोंगडे, पत्रकार रविंद्र लाठे, पत्रकार मनोज जोशी आदींनी मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.