पहूरला साईबाबा मंदिरात मुर्तीची प्राणप्रतिष्ठा

0

पहूर । येथील साईनगरात लोकवर्गणीतून उभारलेल्या भव्य साईबाबा मंदिरात मुर्तीची प्राणप्रतिष्ठा सोहळा गेल्या तीन दिवसांपासून सुरू होता. भक्तीमय वातावरणात ब्रम्हवृंदाच्या मंत्रोच्चारात श्री साईबाबा मंदिरात मुर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. पहिल्या दिवशी ढोलताशांच्या निनादात असंख्य साई भक्तांच्या उपस्थितीत पालखीची भव्य मिरवणूक साईबाबा मंदिरापासून पहूरपेठ व कसबे गावातून काढण्यात आली. त्यानंतर संपूर्ण दिवसभर होमहवन, पुजाअर्चा, असा धार्मिक विधी करण्यात आला. आज रोजी मुर्तीची प्राणप्रतिष्ठा केल्यानंतर महाप्रसादाचा लाभ घेतला. यावेळी साइृबाबा बहुउद्देशीय संस्थानच्या सर्व सदस्यांसह गावकर्‍यांनी केले.