पहुर हद्दीतील अ‍ॅल्युमिनिअम चोरटे भुसावळ बाजारपेठ पोलिसांच्या जाळ्यात

0

उत्तरप्रदेशातील चोरट्यांनी वीज कंपनीची तार लांबवत खडका रोड भागात टाकला होता डेरा

भुसावळ- पहुर पोलिस ठाणे हद्दीतील वीज कंपनीची तीन किलोमीटरपर्यंत लांबीची अ‍ॅल्युमिनिअम तार लांबवून भुसावळात लपून बसलेल्या उत्तरप्रदेशातील चौघा आरोपींच्या मुसक्या आवळण्यात बाजारपेठ पोलिसांना यश आले असून एक आरोपी अल्पवयीन असल्याचे पोलिसांनी सांगितले. पाचोरा विभागाचे डीवायएसपी केशव पातोंड हे डिव्हीजन गस्तीवर असताना त्यांनी पहुरजवळ संशयावद अवस्थेत उभे असलेल्या वाहनातील इसमांची चौकशी केल्यानंतर चौघांनी पोबारा केला होतर तर दोन संशयीतांना पोलिसांना ताब्यात घेण्यात यश आल्यानंतर चोरट्यांचे बिंग फुटले होते.

भुसावळातून चौघा आरोपींच्या आवळल्या मुसक्या
पाचोरा पोलिस उपअधीक्षक केशव पातोंड हे दोन दिवसांपूर्वी डिव्हीजन गस्तीवर असताना पहुर गावानजीक रस्त्यावर उभ्या असलेल्या टाटा मॅजिक वाहनात काही संशयास्पद हालचाली आढळल्यानंतर त्यांनी चौकशी करताच चार संशयीत घटनास्थळावरून पळाले होते तर पोलिसांनी अब्दुल समद जमील कलम खान (53) व आशिश सिंग केशवसिंग (35) या दोघांना ताब्यात घेतल्यानंतर त्यांनी पहुर पोलिस ठाणे हद्दीत अ‍ॅल्युमिनिअम तारेची चोरी केल्याची कबुली दिली होती. टोळीतील अन्य सदस्य भुसावळात खडका रोड भागातील मुस्लीम कॉलनीत भाड्याने घर घेवून राहत असल्याची माहिती दिली होती. आरोपींना ताब्यात घेत पहुर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक बर्गे हे भुसावळात आल्यानंतर त्यांनी बाजारपेठ पोलिसांची मदत घेत पसार झालेल्या निलेशसिंग केशवसिंग (32), आशिक सलमान खान (40), समसोद्दीन खान नसीर खान (39, सर्व रा.रातनपूर, बनारस, उत्तर प्रदेश) यांना अटक केली तसेच अन्य एका अल्पवयीन आरोपीसह ताब्यात घेण्यात आले.

यांनी केली कारवाई
जिल्हा पोलिस अधीक्षक दत्तात्रय शिंदे, अपर पोलिस अधीक्षक लोहीत मतानी, पोलिस उपअधीक्षक गजानन राठोड, बाजारपेठ पोलिस निरीक्षक देविदास पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार अंबादास पाथरवट, पोलिस कॉन्स्टेबल सुनील थोरात, दीपक जाधव, कॉन्स्टेबल कृष्णा देशमुख, निलेश बाविस्कर, उमाकांत पाटील, राहुल चौधरी, संदीप परदेशी आदींच्या पथकाने आरोपींच्या मुसक्या आवळल्या.

Copy