पहुर येथे उर्जा बचत पंधरवाडा

0

पहुर :येथील सावित्रीबाई फुले विद्यालयात उर्जा बचत पंधरवाडा साजरा करण्यात येत असून प्रतिवर्षाप्रमाणे इको फ्रेन्डली क्लबतर्फे जनजागृती करण्यात येत आहे. दिवसेदिवस उर्जेची टंचाई भासत आहे. नवीन उर्जा निर्माण करण्याबरोबरच उसलेल्या उर्जेची बचत करणे हे महत्वाचे आहे. आवश्यकता नसेल तेव्हा बल्ब, पंखा बंद करणे, सौर उर्जेवर चालणारी उपकरणे वापरवे आदी विषयी इको फ्रेन्डली कल्बचे सचिव शंकर भामरे यांनी विद्यार्थ्याना मार्गदर्शन केले. अध्यक्षस्थानी मुख्याध्यापिका व्ही.व्ही. घोंगडे होत्या. के.ए. बनेकर यांनी सुत्रसंचालन केले. प्रास्ताविक एम. एच. बाटी यांनी तर हरिभाऊ राऊत यांनी आभार मानले सर्वे शिक्षक, शिक्षकेत्तर कर्मचारि, विदयार्थी उपस्थित होते.