Private Advt

पहुरमध्ये चोरटे सैराट : दोन दुचाकी लांबवल्या

पहूर : शहरातील जाधव मार्केट येथील दुकानासमोरून चोरट्यांनी दोन दुचाकी अज्ञात चोरट्यांनी लांबवल्या. या संदर्भात पहूर पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला.

पहूर पोलिसात गुन्हा दाखल
शांतीलाल रामदास जाधव (56, रा.जाधव मार्केट, पहुर) हे शेतकरी आहेत.गुरुवार, 3 फेब्रुवारी रोजी रात्री 9.30 वाजेच्या सुमारास दुकानासमोर त्यांच्या मालकीच्या (एम.एच. 19 ए.ए.4328) आणि (एम.एच.19 बी.टी.7696) या क्रमांकाच्या दोन दुचाकी लावण्यात आल्या होत्या मात्र शुक्रवार, 4 फेब्रुवारी रोजी मध्यरात्री चोरट्यांनी दुचाकी लांबवल्याचे निदर्शनास आले. पहूर पोलिस स्टेशनमध्ये शांतीलाल जाधव यांनी धाव घेऊन तक्रार दिल्याने अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास सहाय्यक फौजदार रवींद्र देशमुख करीत आहे.