Private Advt

पहुरजवळ अपघात : पतीचा मृत्यू तर पत्नी गंभीर जखमी

पहूर : पहूर येथील राजश्री कोटेक्सजवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार पती जागीच ठार झाला तर त्यांच्या सौभाग्यवती या गंभीर जखमी झाल्या. रविवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास हा अपघात घडला. ज्ञानेश्वर पांडुरंग सोनवणे (50, शेंदुर्णी लिहा तांडा, ता.जामनेर) असे मयताचे नाव आहे.

अज्ञात वाहनाची दुचाकीला धडक
पहूर येथील जामनेर रोड लगत असलेल्या राज्यश्री कोटेक्स जवळ रविवारी रात्री आठच्या सुमारास अज्ञात वाहनाने दुचाकी (क्रमांक एम.एच.05 सी. डी.4032) ला धडक दिल्याने त्यावरील दुचाकीस्वार ज्ञानेश्वर पांडुरंग सोनवणे (50, शेंदुर्णी लिहा तांडा, ता.जामनेर ) यांचा जागीच मृत्यू झाला तर त्यांची पत्नी सरला ज्ञानेश्वर सोनवणे (45) या गंभीर जखमी झाल्या. त्यांना पुढील उपचारार्थ जळगाव येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. दरम्यान, या अपघाताची माहिती मिळताच आमदार गिरीश महाजन यांनी तातडीने पहूर येथील ग्रामीण रुग्णालयात येऊन मयताच्या नातेवाईकांची चौकशी करून त्यांचे सांत्वन केले. तसेच त्यांनी गंभीर जखमी असलेल्या सरला सोनवणे यांच्यावर तातडीने उपचार करण्याच्या सुचना दिल्या.