Private Advt

पहुरच्या आर.टी.लेले विद्यालयात 2000 सालातील इ.१० वी बॕचचा स्नेहमेळावा

पहूर –  आ.टि.लेले.हायस्कूल मध्ये सन २०००-२००१ सालातील दहावीची बॅच व्हाट्सअप ग्रुप च्या माध्यमाने एकत्र आली.आपल्याला जीवन जगतांना आयुष्यात अनेक लोक भेटत असतात.
परंतु बालपणीच्या सवंगड्याची ओढ मात्र वेगळीच. तो कितीही मोठा झाला,उच्चपदावर गेला तरीही तो सखाच राहतो . २००० ते २००१ साली इयत्ता १० वीत असलेले बालपणीचे मित्र मैत्रिणी ऐकून ७० मुला मुलींनी एकत्रित येऊन स्नेहमेळाव्याचे आयोजन केले .
 
या प्रसंगी मित्र मैत्रिणी भेटताच हस्तांदोलनकरीत ,आस्तेवाईकणे विचारपूस केली.
किरण पाटील यांनी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन करून  एकमेकांचे माहिती देऊन स्वागत केले.
बालपणीचा वर्गमित्र भेटल्याचा आनंद हा प्रत्येकाच्या चेहऱ्यावर ओसंडून वाहत होता.तर आपल्याला ज्यांनी ज्ञानदानाचे पवित्र कार्य करीत सुसंस्कृत पीढी घडविली असे जेष्ठ गुरूजन भेटताच सर्वांनी त्यांचे आशिर्वाद घेतले. यावेळी घेण्यात आलेल्या स्नेह मेळावा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी लेले हायस्कुलचे माजी मुख्याध्यापक एस.एस.गावंडे सर हे होते.तर जुने वर्ग शिक्षक विद्दमान मुख्याध्यापक आर,बी,पाटील,व्हि.जी.भालेराव,सी.टी.पाटील,आर.एम.कलाल,एम.एस.आगारे,आर.टी.देशमुख यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यावेळेस संपूर्ण लेले हायस्कुल मधील विद्यार्थ्यांना शिकवणारे लाडके ए.आर,खांजोडकर,आर.के.पाटील,एम,ची.बोरसे,किशोर पाटील,सुधाकर बोरसे,एच,एस.भामेरे,ए.पी,पाटील,एस.आर.सोनवने,एम.बी.पवार,शरद पाटील आणि शिपाई ताराबाई सपकाळ तसेच आर.टि.लेले.हायस्कुल चे सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांचा शाल ,श्रीफळ भेट देवून स्वागत करण्यात आले.
कार्यक्रामाचे प्रास्तविक किरण पाटील यांनी केले. यावेळी प्रत्येकाने शाळेत घडलेल्या जुन्या आठवणी सांगत आपापली सामाजिक ,कौटुंबिक जबाबदारी सांभाळत उद्योग ,व्यवसाय ,नोकरी करीत असल्याचे सांगितले .
 कार्यक्रमाचे आभार समाधान पाटील यांनी मानले. यानंतर सर्वांनी स्नेहभोजनाचा आस्वाद घेतला. सर्व मित्रांनी इयत्ता १०वीच्या वर्गात बसुन जुन्या आठवणी स्मरून आनंद व्यक्त केला.खरच विद्यार्थी दशेनंतर जुने गुरुजन व मित्र मैत्रिणी यांना भेटून सर्वांनाच मनस्वी आनंद झाल्याचे भाव प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होते. कार्यक्रमास शंकर जाधव,रामेश्वर पाटील,योगेश रोकडे,राजकुमार चौधरी,अशोक घोंगडे,संदिप बेढे,देवेंद्र घोंगडे,दिलीप पाटील,गोपाल कुमावत,नितिन बनसोडे,दिपक चौधरी,हिरकणी शिंदे,उषा सोनवने,सुजाता बेलपत्रे,अर्जना मोरे,माया सठाले यांच्या सर 70 मुल आणि मुली उपस्थिती होती.
सर्वांची विचारपूस करीत भेटी घेत सर्व माजी विद्यार्थ्यांनी एकमेकाला निरोप दिला.