पहिल्या दोन सामन्यांसाठी संघाची घोषणा

0

मुंबई – चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या दोन सामन्यांसाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली आहे. बांगलादेविरोधात खेळल्या गेलेल्या एकमेव कसोटी सामन्यात विजय मिळवणा-या भारतीय संघात कोणताही बदल करण्यात आलेला नाही. विराट कोहलीला कर्णधारपदी कायम ठेवण्यात आले आहे. खेळाडूंचे लक्ष पूर्वीपासून ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या मालिकेवर केंद्रित झाले आहे, अशी प्रतिक्रिया भारताचा कर्णधार कोहलीने व्यक्त केली होती. शिखर धवन मात्र संघात पुनरागमन करु शकलेला नाही. या मालिकेत हार्दिक पांड्या, अभिनव मुकुंद आणि कुलदीप यादव, जयंत यादव तसेच करून नायर यांना खेळण्याची संधी मिळू शकते.

असे आहेत दोन्ही संघ
भारतीय संघ: विराट कोहली (कर्णधार), लोकेश राहुल, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, करुण नायर, अजिंक्य रहाणे, वृद्धिमान साहा, रविचंद्रन आश्विन, रवींद्र जडेजा, ईशांत शर्मा, उमेश यादव, जयंत यादव, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या, अभिनव मुकुंद आणि कुलदीप यादव.
ऑस्ट्रेलिया संघ:
स्टीव्ह स्मिथ (कर्णधार), डेव्हिड वॉर्नर, मॅथ्यू रेनशॉ, शॉन मार्श, पीटर हँड््सकाम्ब, मिशेल मार्श, मॅथ्यू वॅड (यष्टिरक्षक), स्टीव्ह ओकीफी, मिशेल स्कार्ट, नॅथन लियोन, जोश हेजलवुड, एस्टन एगर, उस्मान ख्वाजा, जॅक्सन बर्ड, मिशेल स्वेपसन व ग्लेन मॅक्सवेल.