पहा ठाणे जिल्ह्यात वादळामुळे उद्भवलेली भयावह स्थिती

ठाणे जिल्हातील कल्याण भिवंडी आणि इतर तालुक्यमध्ये तौते वादळाने धुडगूस घातला आहे.कित्येक ठिकणी वादळी वाऱ्यामुळे झाड पडली आहेत तर संरक्षण भिंती हि कोसळल्या आहेत. तौते वादळाने झालेल्या नुकसानाचे विशेष फोटो जनशक्तीच्या हाती लागले आहेत.
अरबी समुद्रात कमी दाबाच्या पट्ट्यामुळे निर्माण झालेल्या आणि गुजरातकडे मार्गक्रमण करणाऱ्या तौते चक्रीवादळाने अतिरौद्रवतार घेतला आहे. रविवारपासून चक्रीवादळाचं स्वरूप तीव्र होत असल्याचं दिसून येत होतं.आता हवामान विभागाने दिलेल्या ताज्या माहितीनुसार चक्रीवादळाने अतिरौद्र रूप धारण केले असून, वेगवान होत ते गुजरात किनारपट्टीच्या दिशेने निघाले आहे. वादळामुळे ताशी १८० ते १९० किमी वेगाने वारे वाहणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. वादळामुळे मुंबईसह शेजारील जिल्ह्यांमध्ये वादळी पाऊस सुरू आहे.