पश्चिम विभागाला नमवीत मध्य विभाग विजयी

0

मुंबई : गोलंदाजांच्या प्रभावी कामगिरीनंतर हरप्रीतसिंहच्या अर्धशतकी खेळीच्या बळावर मध्य विभागाने सय्यद मुश्ताक अली करंडक आंतरविभागीय टी-२0 क्रिकेट स्पर्धेत रविवारी पश्चिम विभागाचा ६ गडी राखून पराभव केला. पश्चिम विभागाने दिलेल्या १६१ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना हरप्रीत (६२) आणि महेश रावत (नाबाद ३0) यांनी चौथ्या गड्यासाठी केलेल्या ७९ धावांच्या बळावर मध्य विभागाने १0 चेंडू राखत आणि ४ बाद १६५ धावा करीत सहज विजय मिळवला.

अंबाती रायुडूनेदेखील २४ धावांचे योगदान दिले.हरप्रीतने ४२ चेंडूंच्या खेळीत ४ षटकार आणि २ षटकार मारले, तर रावतने २२ चेंडूंना सामोरे जात ४ चौकार मारले. त्याआधी अनिकेत चौधरी (४७ धावांत ३ बळी), अमित मिश्रा (२८ धावांत २ बळी) यांच्या सुरेख गोलंदाजीसमोर पश्चिम विभागाने ६१ धावांत ५ फलंदाज गमावले होते; परंतु दीपक हुड्डा (२६ चेंडूंत नाबाद ४९) आणि आदित्य तारे (३३ चेंडूंत ४0 धावा) यांच्या खेळीच्या बळावर संघ ८ बाद १६0, अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारू शकला. हुड्डाने चार षटकार आणि २ चौकार मारले.