पश्चिम बंगालमध्ये रेल्वेने येणार्‍या कोरोना निगेटीव्ह अहवाल अनिवार्य

भुसावळ : पश्चिम बंगाल सरकारने, पश्चिम बंगालमध्ये रेल्वेने येणार्‍या प्रवाशांसाठी ट्रेन सुटण्याच्या 72 तासांच्या आत घेतलेल्या आरटी-पीसीआर चाचणीचा निगेटीव्ह अहवाल सोबत घेऊनच प्रवास करण्यासाठी अ‍ॅडवायजरी जाहीर केली आहे. याव्यतिरिक्त, राज्य सरकारांनी आपापल्या राज्यात लांब पल्ल्याच्या गाड्यांद्वारे प्रवास करणा-या प्रवाशांसाठी प्रवासी सूचना जारी केले आहेत. लांब पल्ल्यांच्या गाड्यांमध्ये प्रवास करणार्‍या प्रवाशांनी त्यांच्या व इतरांच्या सुरक्षिततेसाठी कोविड -19 नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.