युपीए अध्यक्षपदाची चर्चा होणे ही पवारांच्या कामाची पावती: खडसे

0

‘साहेब, आम्हाला तुमचा शंभरावा वाढदिवस साजरा करायचाय’

जळगाव: राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवारांचा आज १२ डिसेंबर रोजी वाढदिवस आहे. त्यानिमित्त राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाकडून व्हर्च्युअल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात, प्रत्येक तालुक्यातील नेते, पदाधिकारी, कार्यकर्त्यांपर्यंत व्हर्च्युअल रॅलीद्वारे संवाद साधण्यात आले. यावेळी माजी मंत्री राष्ट्रवादीचे नेते एकनाथराव खडसे यांनी संबोधन केले. ‘शेतकरी रॅलीनिमित्त शरद पवार बोदवडला आले होते, त्याच वेळी त्यांच्या प्रेमात पडलो असे खडसे यांनी यावेळी सांगितले.

‘साहेब, तुम्ही शंभर वर्ष पूर्ण करा, शंभराव्या वाढदिवसाला आम्हा सगळ्यांना आमंत्रित करा’ असे आवाहनही खडसे यांनी केले.

साऱ्या समाजाला एकत्र ठेवण्याचे काम फक्त शरद पवारांनी केले. युपीएच्या अध्यक्ष होण्याची चर्चा हे फक्त त्यांच्या कामामुळेच आहे.

सर्वच क्षेत्रात आपल्या कार्याचा ठसा उमटविणारे शरद पवार हे एकमेव व्यक्ती आहे. असे एकही क्षेत्र नाही ज्याचा अभ्यास पवारांना नाही असे नाही असेही यावेळी खडसे यांनी सांगितले.

Copy