पवन नेगीला सर्वात मोठा फटका

0

बंगळूरू  । यंदाच्या वर्षी आयपीएल लिलावादरम्यान भारतीय क्रिकेट संघातील पवन नेगी या खेळाडूच्या दरात लक्षणीय घसरण झाल्याचे पाहायला मिळाले. साडेआठ कोटींवरुन पवनचा भाव घसरुन त्याच्यावर केवळ एक कोटीची बोली लावत आरसीबी संघाने घेतले आहे. मागील  नेगीवर सर्वाधिक म्हणजेच साडेआठ कोटींची बोली लावण्यात आली होती. पण, नवव्या पर्वात प्रकाशझोतात आलेल्या नेगीला त्याचा फॉर्म टिकवता आला नसल्यामुळे यंदाच्या आयपीएल 2017 च्या लिलाव प्रक्रियेदरम्यान त्याच्या दरात घसरण झाल्याचे म्हटले जात आहे. नेगीच्या दरात तब्बल साडेसात कोटींची घसरण झाली असून ही बाब सध्या अनेकांचेच लक्ष वेधत आहे.  आयपीएलच्या मागील पर्वात आठ सामन्यांमध्ये पवनने अवघ्या 57 धावा केल्या होत्या. ज्यांमध्ये 19 धावांची खेळी ही त्याची सर्वाधिक धावांची खेळी ठरली होती. रणजी सामन्यांमध्ये आणि आयपीएल चषकामध्ये दिल्ली संघाकडून खेळणार्‍या नेगीला त्याचा फॉर्म टिकवण्यात अपयश आल्यामुळेच आज तो पिछाडीवर आहे असे म्हणावे लागेल.