Private Advt

पवन एक्स्प्रेस अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू : चौघे जखमी

भुसावळ : नाशिकजवळील देवळाली ते लहावी स्थानकादरम्यान 11061 डाऊन लोकमान्य टिळक टर्मिनल कुर्ला ते मुझफ्फरपूर जयनगर पवन एक्स्प्रेसचे 11 डबे रविवारी दुपारी 3.10 वाजेच्या सुमारास घसरले होते. या अपघातात रेल्वेच्या दरवाजात बसलेल्या एका प्रवाशाचा पडून मृत्यू झाला आहे मात्र रेल्वे प्रशासनाने अधिकृतरीत्या त्याची पुष्टी केलेली नाही तर रेल्वे लोहमार्ग पेालिसांकडून या प्रवाशाची ओळख पटवण्याचे काम केले जात आहे.