पर्स लांबविणार्‍यास 4 मेपर्यंत पोलिस कोठडी

0

जळगाव। प्रताप नगरातील स्वामी समर्थ केंद्रातून दर्शन घेऊन घरी जाणार्‍या तरूणीच्या हातातून मोटारसायकलवरून आलेल्या दोन चोरट्यांनी मोबाइल हिसकावून धूम ठोकली होती. या प्रकरणी एलसीबीच्या पथकाने मंगळवारी एका संशयिताला अटक केली आहे.

त्याला बुधवारी न्यायालयात हजर केले असता त्यांनी 4 मे पर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. शिवम मंजुषा हौसिंग सोसायटीतील जिज्ञासा उमाकांत नष्टे या 22 डिसेंबर रोजी स्वामी समर्थ केंद्रातून दर्शन घेऊन परत जात होत्या. त्यावेळी प्रतापनगरातील रत्ना जैन शाळेजवळ दुचाकीवर आलेल्या दोन चोरट्यांनी त्यांच्या हातातील पर्स हिसकावून पसार झाले होते. या प्रकरणी जिल्हा पेठ पोलिस ठाण्यात जबरीचोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यात एलसीबीच्या पथकाने मंगळवारी शेख शकील शेख शरीफ याला अटक केली. शेख शकील याला न्यायालयात हजर केले असता पोलिस कोठडी सुनावली आहे.