पर्समधून दागिने लांबविले; पोलीसात गुन्हा दाखल

0

जळगाव : सुभाष चौकात खरेदीसाठी आलेल्या महिलेच्या पर्समधून चोरट्यांनी दोन तोळे सोन्याचे दागिन्यांसह 64 हजारांचा ऐवज लंपास केल्याची घटना सोमवारी सायंकाळी 5 वाजता घडली. याप्रकरणी मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात दिलेल्या तक्रारीवरून चोरीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पारोळा येथील मंगल शरद पाटील (वय 55) या त्यांच्या नातेवाईकांसह जळगावात सोने खरेदी करण्यासाठी आल्या होत्या. सोमवारी दुपारी 4 वाजेच्या सुमारास त्यांनी आर. सी. बाफना ज्वेलर्समधून काही जुने सोन्याचे दागिने मोडून नवीन दागिने घडवून घेतले. त्यानंतर त्या सुभाष चौकात किरणा दुकानात खरेदीसाठी गेल्या. दुकानदाराला पैसे देण्यासाठी पर्समध्ये हात घातल्यानंतर त्यांना पर्समधील पैशांचा पाऊच गायब असल्याचे त्यांना लक्षात आले. चोरट्यांनी 2 तोळे सोन्याच्या दागिन्यांसह 8 हजार रुपये असा एकूण 64 हजारांचा ऐवज चोरल्याचा गुन्हा मंगळवारी शहर पोलिस ठाण्यात दाखल करण्यात आला.