पर्यावरण साहित्य संमेलन अध्यक्षपदी अमरावतीचे किशोर रिठे यांची निवड

0

जळगाव । महाराष्ट्र साहित्य संस्कृती मंडळ आणि समर्पण संस्था संचालित पर्यावरण शाळेच्या वतीने 31 जानेवारी रोजी, जळगाव येथे आयोजित करण्यात आलेल्या पर्यावरण साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी पर्यावरण चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते आणि सातपुडा फाऊंडेशनचे अध्यक्ष किशोर रिठे (अमरावती) यांची निवड करण्यात आली आहे.

किशोर रिठे गेल्या 30 वर्षांपासून निसर्ग संवर्धन आणि पर्यावरण चळवळीमध्ये सक्रिय आहेत. त्यांनी ऑक्सफोर्ड विद्यापीठातून वन्य जीव संवर्धन या विषयात पदव्युत्तर अभ्यासक्रम पूर्ण केला असून, अभियांत्रिकी क्षेत्राततील उच्च पदवीही त्यांनी संपादन केली आहे. त्यांची विपुल साहित्यसंपदा उपलब्ध आहे. मेळघाट व्याघ्र प्रकल्प, ताडोबा व्याघ्र प्रकल्प, बोर व्याघ्र प्रकल्प यावर आधारित कॉफी टेबल बुकसाठी त्यांनी लिखाण केले आहे.

Copy