पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी पुणे-गोवा सायकल प्रवास

0

पुणे : पर्यावरण संवर्धन आणि विद्यार्थ्यांनी सायकलचा जास्तीत जास्त वापर करावा, हा संदेश सर्वांपर्यंत पोहचविण्यासाठी मॉडर्न कॉलेजमधील तीन प्राध्यापकांनी पुढाकार घेतला आहे. त्यासाठी त्यांनी पुणे ते गोवा हा 450 किमीचा प्रवास पुर्ण केला.

चार दिवसांच्या या प्रवासाचा मुख्य उद्देश सायकल चालवा पर्यावरणाला वाचवा हा होता. सध्या पर्यावरणात अनेक बदल होत आहेत. याबाबत जनजागृती करण्यासाठी हा सायकल प्रवास करण्यात आला. भविष्यातील वाढते प्रदूषण, दिवसेंदिवस वाढत जाणारी वाहतूक समस्या, हवेच्या आणि ध्वनी प्रदूषणातील वाढ यामुळे दमा आणि विविध फैलावणारे आजार याबद्दल विद्यार्थ्यांमध्ये जागृती व्हावी यासाठी या प्रवासातून लोकांचे उद्बोधन करण्यात आले.

450 किमीची सफर
सर्वांनी पेट्रोलजन्य गाड्यांऐवजी सायकलींना प्राधान्य द्यावे यासाठी लोकांना प्रेरीत करण्यात आले. या प्रवासामध्ये डॉ. संजय पाटील, डॉ. दिपक शेंडकर, प्रा. नामदेव डोके आणि विद्यार्थिनी समृद्धी शेंडकर यांनी सहभाग घेतला होता. त्यांनी पिंपळे सौदागर पासून प्रवासाला सुरुवात केली. पुणे-सातारा-कोल्हापुर-कागल-निपाणी-आजरा-अंबोली-सावंतवाडी-म्हापसा-पणजी हा 450 किमीचा प्रवास चार दिवसात पूर्ण केला.

पुढील वर्षी कन्याकुमारी
पुढील वर्षी पुणे ते कन्याकुमारी हा 1600 किमीचा प्रवास 14 दिवसांत विद्यार्थ्यांसोबत पुर्ण करण्याचा मानस शेंडकर यांनी यावेळी व्यक्त केला. या प्रवासात भटकंती फेम अभिनेते मिलींद गुणाजी यांची भेट झाली. या उपक्रमासाठी त्यांना प्रोगे्रसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष डॉ.गजानन एकबोटे यांचे मार्गदर्शन लाभल्याचे त्यांनी सांगितले.