परीक्षा होणार की नाही?; या दिवशी होणार निर्णय

0

नवी दिल्ली: कोरोनामुळे राज्य सरकार परीक्षा न घेण्यावर ठाम आहे तर यूजीसी परीक्षा घेण्याच्या निर्णयावर. हे प्रकरण आता सर्वोच्च न्यायलयात पोहोचले आहे. आज सर्वोच्च न्यायलयात याबाबत सुनावणी झाली. मात्र निर्णय झालेला नसून याबाबत पुढील सुनावणी १० ऑगस्टला होणार आहे. परीक्षा होणार की विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्यात येणार हे पुढील सुनावणीत स्पष्ट होणार आहे.

कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव आणि धोका लक्षात घेऊन काही विद्यापीठे आणि महाराष्ट्रासह काही राज्यांतील सरकारांनी यावर्षी पदवीच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत असमर्थता व्यक्त केली होती. तसेच यावर्षी अंतिम वर्षातील विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याची योजना आखली होती. मात्र यूजीसी अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याबाबत आग्रही होती. तसेच सप्टेंबरनंतर परीक्षा घेण्याचा आमचा प्रयत्न आहे, असे यूजीसीने सांगितले आहे.

Copy