परीक्षा होणारच; युजीसीकडून मानक कार्यपद्धती जाहीर

0

नवी दिल्ली: युजीसीने पदवी, पदव्युत्तर अभ्यासक्रमाच्या अंतिम वर्षाच्या परीक्षा घेण्याचे आदेश दिले आहे. मात्र कोरोनाच्या पार्श्वभूमीवर अनेक राज्य सरकार परीक्षा न घेण्यावर ठाम आहे. परीक्षेबाबत संभ्रम असताना आता केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाने आज गुरुवारी अंतिम वर्षांच्या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती जाहीर केली. यूजीसीच्या नियमांनुसार अंतिम वर्षाची परीक्षा घेणे आवश्यक आहे, असे केंद्रीय गृह मंत्रलयाने सांगितले आहे. यूजीसीने प्रसिद्ध केलेल्या पत्रकातही अंतिम वर्षाची परीक्षा घेणे महत्त्वाचे असल्याचे सांगितले आहे.

यूजीसीने बुधवारी या परीक्षांसाठी मानक कार्यपद्धती (एसओपी) एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे जाहीर केली. यात नियमावली जाहीर करण्यात आली आहे. सोशल डीस्टन्सिंग सारख्या विषयाचा यात समावेश आहे. दोन मीटरचे अंतर राखणे, मास्क आणि आरोग्य सेतू अॅप अनिवार्य. त्याचबरोबर ज्या विद्यार्थ्यांना सर्दी, पडसे, ताप आणि करोना विषाणूचे दुसरी लक्षणे असल्यास त्या विद्यार्थ्याला दुसऱ्या दिवशी परीक्षेला बसू द्यावे किंवा दुसऱ्या वर्गात बसून द्यावे याबाबत निर्णय घेणे, त्याचबरोबर परीक्षकांनाही मास्क आणि हातात ग्लोव्ह्ज घालणे बंधनकारक असल्याचे म्हटले आहे.

या आहेत मानके
*प्रत्येक परीक्षा केंद्रावर थर्मोगनने तापमान तपासणी करावी
*एक सेल्फ डिक्लरेशन फॉर्म भरावा
*त्याचबरोबर परीक्षार्थींना आपल्या मोबाईलमध्ये आरोग्य सेतू अॅप अनिवार्य

*ज्या परीक्षार्थीने सेल्फ डिक्लरेशन फॉर्म आणि थर्मोगनने तपासणी केलेली नसेल त्यांना परीक्षा केंद्र सोडण्यास सांगण्यात येईल.
*परीक्षा केंद्रावर फिजिकल डिस्टंसिंगचा विशेष पालन करण्यात येईल.
*परीक्षा केंद्र निर्जंतुक करावे
*सर्व परीक्षा केंद्रांवर हँड सॅनिटायझर आणि हँडवॉश ठेवावे
*परीक्षेला उपस्थित असलेले परीक्षक, विद्यार्थी आणि इतर लोकांची नोंद करावी
*परीक्षा हॉलमध्ये बसलेल्या दोन विद्यार्थ्यांमध्ये एक बेंच रिकामा ठेवण्यात यावा
*एका वर्गात चार रांगा असतील यामध्ये त्यांच्यामध्ये एका विद्यार्थ्याच्या जागेची रिक्त जागा असेल.

Copy