परिस्थितीवर मात करून ध्येय गाठनार्‍यांना यशाचे दार खुले

0

जळगाव : परिस्थितीवर मात करून ध्येय गाठनार्‍यांसाठी कधीही यशाचे दार खुले असते. अभ्यास कशासाठी करायला हवा याचे महत्व लक्षात घेऊन उद्देश, तुमचे धेय निश्चितच प्राप्त करू शकतात. भविष्यात कुणाकडे हात पुढे करण्याची वेळ येऊ नये म्हणून घेतलेल्या कामाच्या यशस्वीतेसाठी त्याग करणे शिका असे मत प्रा. एस.आर.महाजन यांनी व्यक्त केले. ते जी.एच.रायसोनी कनिष्ठ महाविद्यालयात लीड इंडिया 2020 कार्यक्रमात बोलत होते. याप्रसंगी प्राचार्य. प्रल्हाद खराटे, प्रा.एस.आर.सोनवणे, प्रा.सोनल तिवारी, प्रा.दिपक पाटील, अनिल सोनार आदी उपस्थित होते.

यशस्वी होण्यासाठी निश्‍चय आवश्यक
प्रा. महाजन यांनी पुढे सांगितले की, आयुष्यात चांगला व वाईट असे दोन मार्ग असतात. त्यापैकी कोणत्या मार्गाने आपल्याला प्रवास करायचा आहे, याचाही निश्चय करता येत नाही. जीवनात काय केले पाहिजे याचाही निश्चय करणे कठीण जाते. एक पेपर वाटणारी व्यक्ती भारताचे राष्ट्रपती होऊ शकतात. तर आपण का नाही. माजी राष्ट्रपती अब्दुल कलाम यांनी देशाच्या युवकांच्या डोळ्यात भारत महासत्ता होण्याचे स्वप्न पाहिले आहे.

यांची होती उपस्थिती
लीड इंडिया 2020 या कार्यक्रम प्रसंगी प्रा.संदीप पाटील, संतोष मिसाळ, प्रा.निलिमा वाकोडे, प्रा.कोमल तिवारी, प्रा.पल्लवी भालेराव, प्रा.रेखा वाघ व बहुसंख्य विद्यार्थी उपस्थित होते. सूत्रसंचालन व आभार प्रा.विजय पाटील मानले.

जिद्दीने प्रवास करा
प्रा. महाजन यांनी चर्चा संशोधनावर व्हायला हवी, माध्यमांवरील केलेल्या पोस्टवर नाही. शिक्षण करताना आपण इतरांसाठी शिकत नाही तर स्वतः साठी शिक्षण घेतो याची जाणीव ठेवा आणि पळवाटा न काढता जिद्दीने प्रवास करा. असेही त्यांनी यावेळी सांगितले. जीवनात ध्येय निश्‍चित केल्यास यशाचे शिखर गाठता येते असे महाजन यांनी यावेळी सांगितले. संशोधनावर विद्यार्थ्यांनी आपले लक्ष केंद्रीत करण्याची अपेक्षा महाजन यांनी यावेळी व्यक्त केली.