परिसर मुलाखतीत 4 अभियांत्रिकी विद्यार्थ्यांची निवड

0

जळगाव। येथील जी.एच.रायसोनी अभियांत्रिकी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांसाठी नुकतेच परिसर मुलाखतींचे आयोजन करण्यात आले होते. या मुलाखतींसाठी अभियांत्रिकीच्या अंतिम वर्षातील सर्व शाखेचे विद्यार्थी पात्र होते. यावेळी घेण्यात आलेल्या मुलाखतीत 4 विद्यार्थ्यांची निवड झाली करण्यात आली आहे तर 56 विद्यार्थ्यांनी अंतिम टप्पा गाठला होता. परिसर मुलाखतीस रायसोनी समूहाचे अमरावती, नागपूर येथील विद्यार्थीही उपस्थित होते. मुलाखत घेण्यासाठी नामवंत अशा एरेट टेक्नोलॉजी आस इनोव्हेशन कंपनीचे व्यवस्थापक आनंद शिरसाठ व निखील पांडे उपस्थित होते. घेण्यात आलेल्या मुलाखतीत भाग्यश्री कालमेघ, शितल कोतकर, शुभम बोबडे व कार्तिकेय गुप्ता यांचा समावेश आहे. निवड झालेल्या एकूण विद्यार्थ्यांमधून जळगाव कॅम्पसचे 2 विद्यार्थी आहेत.

विद्यार्थ्यांना यांनी केले मार्गदर्शन
निवड झालेल्या विद्यार्थ्यांना जूलै महिन्यात नियुक्त करण्यात येणार असल्याची माहिती प्लेसमेंट अधिकारी निलेश बाऊस्कर यांनी दिली. मुलाखतींसाठी प्रा.राकेश तिवारी, प्रा.सुशांत सामलेटी व प्रा.हिरालाल साळुंखे यांनी नियोजन केले होते.निवड झालेल्या विद्यार्थ्यांना समूह चर्चा, मुलाखत तंत्र, संवाद कौशल्य यासाठी प्रा.राहुल त्रिवेदी यांचे मार्गदर्शन लाभले. यावेळी निवड झालेल्या विद्यार्थ्यांचे कार्यकारी संचालक प्रीतम रायसोनी, प्राचार्य डॉ.प्रभाकर भट यांनी अभिनंदन केले.