परिवर्तन संस्थेतर्फे भवरलाल जैन यांना आदरांजली

0

जळगाव। जैन उद्योग समुहाचे संस्थापक भवरलाल जैन यांच्या प्रथम स्मृतिदिनाचे औचित्य साधून परिवर्तन संस्थेतर्फे सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले. संस्थेतर्फे भवरलाल जैन यांना आदरांजली वाहिन्यात आली. महोत्सवाच्या पहिल्या दिवशी रविवारी 26 रोजी अनुभूती शाळेच्या विद्यार्थी व शिक्षकांनी गायन, तबला व गिटार बासरी वादनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आले.

आगळ्यावेगळ्या फ्युजन कार्यक्रमाने मान्यवरांसह रसिक मंत्रमुग्ध झाले. परिवर्तनतर्फे आयोजित सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन काव्यरत्नावली चौकातील भाऊंचे उद्यानात कविवर्य ना.धो.महानोर यांच्या हस्ते करण्यात आले. सांस्कृतिक तसेच विविध कार्यक्रम सादरीकरणासाठी तयार करण्यात आलेल्या एम्पी थिएटरचे ज्येष्ठ रंगकर्मी सुषमा प्रधान यांच्या हस्ते करण्यात आले. महोत्सवाला सोमवारी 27 रोजी जगप्रसिध्द चित्रकार प्रभाकर कोलते यांची उपस्थिती लाभली. परिवर्तनचे शंभू पाटील हे त्यांची प्रकट मुलाखत घेतली. याद्वारे ते चित्रकलेतील सौदर्य स्थळे, गूढता, रंग व रेषा यांच नात संवादातून उलघडली.