परिक्षा काळात निवडणुकीच्या कामास नकार

0

बोदवड । आगामी जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीसंदर्भात तालुक्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची नावे मागण्यात आली असून याच कालावधीत बारावीच्या विविध तोंडी तसेच प्रात्याक्षिक परिक्षा असल्यामुळे शिक्षकांनी काम न करण्यास नकार दिला असून यासंदर्भात तहसिलदारांना निवेदन देण्यात आले आहे. येत्या फेब्रुवारी महिन्यात निवडणुका होऊ घातल्या असून तहसिल प्रशासनामार्फत कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांची नावे मुख्याध्यापकांकडून मागविण्यात आली आहे. याच कालावधीत 8 ते 25 फेब्रुवारी या कालावधीत बारावीच्या तोंडी तसेच प्रात्याक्षिक परिक्षा बोर्डाद्वारे नियोजित आहे. या परिक्षांसाठी कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.

तरी आयोगानेदेखील परिक्षा कामकाजात व्यस्त असलेल्या शिक्षकांना नियुक्ती काम देवू नये, असे म्हटले आहे. त्यामुळे या शिक्षकांना निवडणुकीच्या कामातून वगळण्यात येण्याची मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे. या निवेदनावर पी.एम. पाटील, आर.आय. तडवी, एम.व्ही. होले, पी.आर. जोशी, डी.जे. चिकटे, एम.बी. पंडीत, ए.टी. धांदडे, जे.एन. पाटील, आर.एस. गवळी, के.एस. उबाळे आदींच्या स्वाक्षर्‍या आहे.