पराभव डोळ्यासमोर दिसत असल्याने भाजप असंवैधानिक कृत्य करत आहे-ज्योतिरादित्य सिंधिया

0

भोपाळ-मध्य प्रदेश निवडणुकीसाठी २८ रोजी मतदान झाले. मतदानानंतर मतदानयंत्र ज्या ठिकाणी ठेवण्यात आले आहे. त्याठिकाणी दिवे बंद आहेत, काही ठिकाणी सीसीटीव्ही बंद असल्याचे व्हिडीओ समोर आले आहे. यावरून कॉंग्रेस नेते खासदार ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपवर संशय व्यक्त केले आहे. मध्य प्रदेशची राजधानी भोपाळ येथे स्ट्रॉग रूमच्या बाहेर एलईडी दिवे बंद होते, सागर येतील विद्यमान गृहमंत्री यांच्या मतदार संघातील मतदान यंत्र ४८ तास उशिरा स्ट्रॉग रूमवर पोहोचविणे यावर सिंधिया यांनी संशय व्यक्त केला आहे.

ज्योतिरादित्य सिंधिया यांनी भाजपला पराभव समोर दिसत असल्याने लोकशाही आणि लोकांच्या मतांवर अन्याय करत असल्याचे आरोप केले आहे. निवडणूक आयोगाने याची चौकशी करून दोषींवर कारवाई करावी अशी मागणी केली आहे.

Copy