परराज्यातील कुटुंबाला असलोद ग्रामस्थांची मदत

0

असलोद। शहादा तालुक्यातील असलोद गावात दरवर्षी लस्सी व थंड पेयच्या व्यवसाय करण्यासाठी परराज्यातील एक कुटुंब येत असते. परंतु राज्यात लाँकडाऊन झाल्याने हे परराज्यातील एक कुटुंब असलोद गावात अडकून आहे. त्यांना खायला धान्य, खर्च करायला पैसे नव्हते. सर्व पैसे लस्सी व थंडपेयच्या व्यवसायात अडकले आहेत. पण लाँकडाऊन असल्याने व्यवसाय बंद झाला. सगळे पैसे भांडवलमध्ये टाकले. दुकान बंद असल्याने भांडवल अटकलेले निघाले नाही. नफा तर मिळालाच नाही. व्यवसाय बंद असल्याने व्यक्ती हतबल झालेचे गावातील लोकांना समजले. त्याची सर्व माहिती घेतली तर त्यात पती, पत्नी, लहान बाळ, भाऊ असे सर्व कुटुंब दोन दिवस उपाशी आहे, असे समजले तेव्हा ही सर्व माहिती गावात माहीत पडली. तेव्हा गावातील वरिष्ठ व तरुणांनी गावातील खडकी गल्लीत फिरून त्यांना दोन महिने पुरेल एवढा अन्नसाठा जमा केला व खर्चासाठी काही रोख स्वरूपात रक्कम जमा करुन त्याला देण्यात आली. लोकांनी खुल्या मनाने मदत केली त्याबद्दल देणगी दात्याचे आभार मानत आहे.

Copy