परप्रांतीय मजुरांच्या मदतीसाठी धावली ‘लालपरी’

1

मुक्ताईनगर आगारातील तीन बसेसद्वारे मजुरांना बर्‍हाणपूर सीमेवर सोडले

मुक्ताईनगर : कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर लॉकडाऊन सुरू झाल्याने राज्यभरात रेल्वे व एस.टी.सेवा ठप्प झाल्यानंतर अनेकांनी पायीच आपापल्या गावाकडचा रस्ता धरला होता मात्र सुमारे दिड महिन्यानंतर शनिवारी परीवहन मंत्री अनिल परब यांनी लॉकडाऊनमध्ये राज्यातील विविध भागात अडकलेल्या विद्यार्थी, मजुर, नागरीकांना घरी पोहचविण्यासाठी एसटी महामंडळाकडून 11 मे रोजी पासून मोफत बस सुरू करण्याची घोषणा केल्यानंतर रविवारी मुक्ताईनगर आगारातील तीन बसेसद्वारे कामगार व परप्रांतीय मजुरांना आरोग्य तपासणी करून बर्‍हाणपूर सीमेवर सोडण्यात आले.

एका बसमधून 22 प्रवाशांचा प्रवास
मुक्ताईनगर शहरात येणार्‍या परप्रांतीय मजुरांची प्रवर्तन चौकात आरोग्य विभागातर्फे प्राथमिक चाचणी करण्यात आली तर एका बसमध्ये 22 प्रवासी बसवण्यात आले. रविवारी दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत मुक्ताईनगर आगाराच्या तीन एस.टी.बसेसच्या फेर्‍यातून परप्रांतीय मजुरांना बर्‍हाणपूर बॉर्डरपर्यंत सोडण्यात आले तर तेथून मध्यप्रदेश शासनाकडून या मजुरांना थेट बिहार, छत्तीसगड व युपीच्या बॉर्डर पर्यंत सोडण्यात यत आहे.

यांची होती उपस्थिती
प्रसंगी मुक्ताईनगर बस आगार प्रमुख संदीप साठे, पोलिस निरीक्षक सुरेश शिंदे, ग्रामसुरक्षा दलाचे दिनेश कदम, एस.टी.कर्मचारी संजय मराठे, दीपक चौधरी, आर.जे.बोदडे, अशोक काटे, कॉन्स्टेबल मोजेश पवार, कल्पेश आमोदकर, उपजिल्हा रुग्णालयाचे डॉ.इमरान खान, परीचारीका ज्योती खरे, आरोग्य कर्मचारी प्रशांत मढावी, नगरपंचायत कर्मचारी निलेश डवले, किशोर महाजन, सचिन काठोके, रत्नदीप कोचुरे आदींची उपस्थिती होती.

Copy