‘पब्लिक ऑडीट’ मोहिम राबविणार- शिवराम पाटील

0

जळगाव  । महानगर पालिकेसंबंधी नागरिकांची तक्रार मनपातील कर्मचारी स्विकारत नसून तक्रार घेण्यास टाळाटाळ करण्यात येत असते. लोकशाही दिनी कर्मचारी अधिकारी एकमेंकांची बाजु सांभाळतात त्यामुळे नागरिकांच्या समस्यांसंबंधी निराकरण होत नाही. नागरिकांची बाजु घेण्यास या ठिकाणी कोणताही नगरसेवक किंवा प्रतिनिधी उपस्थित नसतो या विरुध्द ‘पब्लिक ऑडीट’ मोहिम राबविणार असल्याची माहिती शिवराम पाटील यांनी पत्रकार परिषदेतून दिली. नागरिकांनी समस्यां मांडण्यासाठी आणि जनतेच्या कल्याणासाठी एकत्र येवून जनजागृती करावी यासाठी ‘पब्लिक ऑडीट’ मोहिम राबविण्यात येणार आहे. यावेळी अनिल नाटेकर, अमोल कोल्हे, मुरलीधर खडके, दिपक गुप्ता, राय अदुजा, डॉ.सरोज पाटील, राधेश्याम चौधरी उपस्थित होते.