पन्नास दिवस उलटूनही कॅशलेसबाबत नागरीकांमध्ये उदासीनता

0

एरंडोल : एरंडोल शहर हे जवळपास चाळीस हजार लोकसंखेचे गाव असून शहराची रोजची उलाढाल हि दोन ते अडीच कोटीची असून देखील कॅशलेससाठी अजूनही पिछाडी वर आहे शहरात कापड, किराणा तसेच इतरही मोठ्या व्यापार्‍यांकडे रोखी व्यतीरिक्त कॅशलेस बाबतची कुठलीच व्यवस्था नाही. अजूनही जनतेत जनजागृती नाही तरी जनजागृती ची गरज आहे. 8 नोहेंबर रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यवहारातील हजार व पाचशेच्या नोटा बंद करून देशातील भ्रष्टाचार व शासन करचोरी थाबंविण्यासाठी रोजचे दैनंदिन व्यवहार जनतेने बँकिंग किंवा कॅशलेस पद्धतीने करावे असे आवाहन जनतेस केले होते. पण 50 दिवस उलटूनही एरंडोल शहरात सर्व व्यवहार हे अजूनही रोखीने होत आहेत. शहरात आश्चर्याची गोष्ट म्हणजे फक्त दोन पान दुकाने वगळता कुठेही कॅशलेसची सोय दिसून येत नाही. कॅशलेसच्या जनजागृती व्यवहाराबाबत सामाजिक संस्था व प्रशासनाने मार्गदर्शन करण्याची गरज असल्याचे सुजान नागरिकांकडून बोलले जात आहे. कॅशलेस बाबत बँक व प्रशासनाकडून व्यापारी किंवा नागरिकांमध्ये कुठल्याच प्रकारची जनजागृती करतांना दिसून येत नाही किंवा आता तरी प्रशासनाने या प्रकाराकडे लक्ष द्यावे व शहरातील सुट्या नोटांचा प्रश्न सोडवावा.

आमच्या मोठ्या अडचणी वाढल्या असून मजूर कामासाठी उपलब्ध करणे कठीण झाले आहे. आम्हाला आठवड्याला शेतीसह मजुरीसाठी 25000 पेक्षा जास्तीची गरज पडते ती वेळेवर मिळत नाही मजुर रोकडा पैसे मागतात. आमची मोठी अडचण झालेली आहे. कॅशलेससाठी ग्रामीण स्थरावर जनजागृती करणे गरजेचे आहे.
– महेश मराठे, बोरगाव, सामान्य शेतकरी)