सतीची वाडीत धान्य वाटप

0

पनवेल । आपला आधार फाऊंडेशन या सामाजिक संस्थेतर्फे बुधवारी पनवेल तालुक्यातील सतीची वाडी या गावामध्ये गरीब आणि गरजू आदिवासी कुटुंबांना धान्यवाटप करण्यात आले. प्रत्येक कुटुंबास 4 किलो तांदूळ याप्रमाणे जवळपास 100 लोकांना आपला आधार फाऊंडेशन संस्थेतर्फे वाटप करण्यात आले.

आपला आधार फाऊंडेशन ही संस्था गोरगरीब जनता, सुविधांपासून वंचित असणारे आदिवासी, दुर्गम भागात राहणारे नागरिक, अबला महिला यांना मदत करण्यासाठी स्थापन करण्यात आली असून, संस्थेतर्फे नियमितपणे सामाजिक उपक्रम राबवणार असल्याची प्रतिक्रिया आपला आधार फाऊंडेशन सामाजिक संस्थेचे संस्थापक केवल महाडिक यांनी सांगितले. या वेळी यतीन देशमुख, गणपत वारगडा, ओमकार महाडिक, रोशन पाटील, कान्ह्या चौधरी आदी उपस्थित होते. या सामाजिक संस्थेतर्फे लवकरच या गावात इतर उपक्रमही राबवण्यात येणार असून, खराब रस्ते, पाणीटंचाई यावर कायमचा तोडगा काढण्यासाठी संस्था प्रयत्न करेल, असे अध्यक्ष यतीन देशमुख यांनी ग्रामस्थांना सांगितले.