पनवेल आणि हजूर साहिब नांदेड दरम्यान अतिरीक्त विशेष ट्रेन

भुसावळ : रेल्वे प्रवाशांच्या सोयीसाठी पनवेल ते हजूर साहिब नांदेड दरम्यान अतिरीक्त विशेष गाड्या चालवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

पनवेल-हजूर साहिब नांदेड विशेष ट्रेन
डाऊन 07313 विशेष ट्रेन पनवेल-हजूर साहिब नांदेड विशेष ट्रेन 19 मार्च ते 1 एप्रिलदरम्यान दर मंगळवार, गुरुवार, शुक्रवार आणि रविवारी चार वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी 11 वाजता हजूर साहिब नांदेडला पोहोचेल.  डाऊन दिशेला या गाडीला मनमाडला थांबा देण्यात आला आहे. अप 07314 विशेष हजूर साहिब नांदेड-पनवेल विशेष ट्रेन 18 मार्च ते 31 मार्चदरम्यान दर सोमवार, बुधवार, गुरुवार आणि शनिवारी 5.35 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी 12.30 वाजता पनवेलला पोहोचेल. अप दिशेला मनमाड थांबा देण्यात आला आहे. या गाडीला एक वातानुकुलीत प्रथम श्रेणीसह वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, एक वातानुकुलीत द्वितीय श्रेणी, दोन वातानुकुलीत तृतीय श्रेणी, 13 शयनयान आणि 4 द्वितीय श्रेणी आसन बोगी जोडण्यात येणार आहे. संपूर्णपणे आरक्षित विशेष गाडी बुकिंग विशेष शुल्कासह सर्व संगणकीकृत आरक्षण केंद्रांवर आणि रेल्वेच्या या संकेतस्थळावर सुरू झाले आहे. केवळ कंफर्म तिकिट असलेल्या प्रवाशांनाच या विशेष गाड्यांमध्ये चढण्याची परवानगी देण्यात येईल. प्रवाशांना बोर्डिंग, प्रवासादरम्यान आणि गंतव्यस्थानाच्या वेळी कोविड-19 शी संबंधित सर्व निकषांचे पालन करावे लागेल.