Private Advt

पनवेल आणि प्रयागराज दरम्यान होळीनिमित्त विशेष गाडी धावणार

भुसावळ : रेल्वे गाड्यांना सण-उत्सव व होळीच्या पार्श्वभूमीवर वाढलेली गर्दी पाहता पनवेलसह प्रयागराज दरम्यान विशेष गाडीच्या चार फेर्‍या होणार आहेत. गाडी क्रमांक 04116 विशेष गाडी 21 व 28 मार्च 10.30 वाजता पनवेल येथून सुटल्यानंतर तिसर्‍या दिवशी प्रयागराजला 3.35 वाजता पोहोचणार आहे तर गाडी क्रमांक 04115 अतिजलद विशेष गाडी प्रयागराज येथून 20 व 27 मार्च रोजी 5.25 वाजता सुटल्यानंतर दुसर्‍या दिवशी पनवेलला 8.50 वाजता पोहोचणार आहे.

या स्थानकावर थांबा
या गाडीला कल्याण, नाशिक रोड, भुसावळ, खंडवा, इटारसी, भोपाळ, बिना, ललितपूर, टिकमगड, खरगापूर, एमसीएस छतरपूर, खजुराहो, महोबा, बांदा, चित्रकूट धाम कारवी, माणिकपूर, शंकरगड आणि नैनी रेल्वे स्थानकावर थांबा देण्यात आला आहे. या गाडीला दोन तृतीय वातानुकूलित, 12 शयनयान, सहा सामान्य द्वितीय श्रेणी बोगी जोडण्यात येणार आहे. रेल्वेच्या संकेतस्थळावर 19 मार्चपासून विशेष शुल्कासह विशेष ट्रेन क्रमांक 04116 चे बुकिंग सुरू होणार आहे.