Private Advt

पद्मावतीसाठी 15 मिनिटांचे ब्लॅकआऊट

0

मुंबई : पद्मावती चित्रपटाच्या समर्थनार्थ चित्रपट आणि मालिका दिग्दर्शक रविवारी एकवटले होते. या सिनेमाला समर्थन दर्शवण्यासाठी देशभरात चित्रपटांचे शुटिंग सुरू असलेल्या ठिकाणी 15 मिनिटांचे ब्लॅकआऊट आंदोलन करण्यात आले. भारतीय सिनेमा आणि टेलिव्हिजन मालिका दिग्दर्शकांच्या संघटनेने हे आंदोलन केले.

19 संघटना सहभाग
देशातील विविध ठिकाणी झालेल्या या आंदोलनात कलाकार, दिग्दर्शक, मेकअपमन, टेक्निकल स्टाफ असे हजारो आंदोलक सहभागी झाले होते. आंदोलनात चित्रपट क्षेत्रांशी संबंधित वेगवेगळ्या 19 संघटनांनी सहभाग नोंदविला. या सर्वांनी 15 मिनिट शुटिंग बंद ठेऊन आंदोलन केले. या सिनेमाच्या समर्थनार्थ बॉलिवूडमधील अनेक दिग्गज कलाकारांनीही पुढाकार घेतला आहे.