पदवीधर, शिक्षक निवडणुकीत भाजपलाच यश मिळेल: फडणवीसांचा दावा

0

नागपूर: महाराष्ट्रात पदवीधर आणि शिक्षक मतदार संघाच्या विधान परिषदेची निवडणूक होत आहे. आज मंगळवारी १ डिसेंबरला मतदान होत आहे. महाविकास आघाडी विरुद्ध भाजपमध्ये होणारी ही पहिलीच निवडणूक आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि भाजपची कसोटी लागली आहे.

या निवडणुकीत भाजपला चांगले समर्थन लाभले असून भाजपचे सर्व उमेदवार विजयी होतील असा विश्वास फडणवीस यांनी व्यक्त केले आहे. नागपूरमध्ये मतदान केल्यानंतर माध्यमांशी ते बोलत होते. नागपूरमध्ये केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी देखील मतदान केले.

सकाळच्या सत्रात मतदानाचे प्रमाण कमी दिसून आले. पदवीधर मतदारांनी अधिकाधिक मतदान करावे असे आवाहनही फडणवीस यांनी केले आहे.

Copy