पथनाटयातून विद्यार्थ्यांचे गावात समाज प्रबोधन

0

शेंदुर्णी । येथील आचार्य गरुड माध्यमिक विद्यालयात राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विविध पथ नाट्याद्वारे समाज प्रबोधनाचा कार्यक्रम उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी विद्यालयातील इयत्ता 5 वी ते 7 वीच्या विद्यार्थ्यांनी ‘बेटी बचाओ, बेटी पढाओ’, हगणदारी मुक्त महाराष्ट्र, प्लॅस्टीकचा वापर टाळा, वनऔषधीचा उपयोग, स्वच्छता अभियान या कार्यक्रमाचे उद्घाटन नवनिर्वाचित जि.प. सदस्या सरोजनीताई गरुड व पं.स. सदस्य डॉ.किरण सुर्यवंशी यांच्याहस्ते करण्यात आले. सदर कार्यक्रम पारस चौक, पहूर दरवाजा, वाडीदरवाजा येथे विविध पथनाटयातून विद्यार्थ्यांनी गावाचे समाज प्रबोधन केले. कार्यक्रमाचा शेवट गांधी चौक येथे शेंदूर्णी शिक्षण संस्थेचे चेअरमन संजय गरुड यांच्या हस्ते करण्यात आले.

यांनी घेतले परीश्रम

कार्यक्रम प्रसंगी संजा प्रबोधनाद्वारे सादरी करणाला सर्वांनी प्रतिसाद द्यावा असे आवाहन त्यांनी केले. या प्रसंगी प्रकाश देशमुख, रमेश गरुड, पन्नालालजी झवर, अशोक जैन व शेंदूर्णीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वीतेसाठी विद्यालयाचे मुख्याध्यापक बी.नी. मांडवडे, उपमुख्याध्यापक एस.डी.चव्हाण पर्यवेक्षक डी.आर. शिंपी, डी.एस.वारांगणे, आर.व्ही.पाटील, शाम पाटील, टी.जी.पाटील, भदावे, एन.ए.साळुंके, आर.बी. चौधरी, एस.आर. चव्हाण व 5 ते 7 विभागातील सर्व शिक्षक शिक्षीका व विद्यार्थी यांनी मेहनत घेतली. गावातील सर्व नागरिकांनी कौतुक केले.