पत्रा उचकटून केली चोरी

0

कासारवाडी : बंद खोलीचा पत्रा उचकटून खोलीतून 25 हजारांचे सामान चोरून नेले. ही घटना शुक्रवारी रात्री उघडकीस आली.
नुरुल इमरुद्दीन इस्लाम (वय 44, रा. एनसीसी लेबर कॉलनी, कासारवाडी रेल्वे स्टेशन) यांनी याप्रकरणी भोसरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नुरुल यांनी त्यांच्याकडे असलेले ब्रेकर मशीन आणि एक ग्रींडर मशीन कासारवाडी रेल्वे स्टेशन येथे एनसीसी लेबर कॉलनी येथे एका पत्र्याच्या खोलीत ठेवले होते. अज्ञात चोरट्यांनी शुक्रवारी रात्री सात ते साडेअकरा वाजण्याच्या सुमारास त्या खोलीचे मागच्या बाजूचे पत्रे उचकटून खोलीत प्रवेश केला. खोलीत ठेवलेले चार ब्रेकर मशीन आणि एक ग्रींडर मशीन असा एकूण 25 हजार रुपये किमतीचा ऐवज चोरून नेला. यावरून भोसरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भोसरी पोलीस तपास करीत आहेत.