पत्रकाराने दिला पोलिसांना ‘मदतीचा हात’

0

फैजपूरहून जळगाव जाणार्‍या पोलिसांना वाहनातून सोडले

खिर्डी : येथून जवळच असलेल्या फैजपूर येथे रावेर येथून रात्रपाळी करून जळगावी परत येत असलेल्या पोलिस कर्मच्यार्‍यांना खिर्डी येथिल जनशक्तिचे पत्रकार व तत्पर फाउंडेशनचे संचालक सादीक पिंजारी यांनी मदतीचा हात दिला. पत्रकार सादीक पिंजारी हे अत्यावश्यक सेवेतील वाहनाने जळगाव येथे हरबरा नेत असतांना फैजपूर येथे दोघे पोलिस कर्मचारी उभे दिसल्यानंतर अनेक वाहनांना थांबवण्याचा प्रयत्न केल्यानंतर कुणीही थांबत नसल्याचे पाहून पिंजारी यांनी चालक विनोद पाटील यांना थांबवण्याची सूचरना केली. पोलिसांची विचारपूस केल्यानंतर त्यांना गाडी बसण्यास सांगितल्यानंतर पोलिसांच्या चेहर्‍यांवर हास्य उमटले. देशासह राज्यात थैमान घातलेल्या कोरोनावर निवांत चर्चा करत जळगावपर्यंत आपुलकीच्या भावनेने विविध विषयावर चर्चा झाल्या. पत्रकाराने जळगावपर्यंत पोलिसांना सोडल्याने पिंजारी यांचे अनेकांनी कौतुकही केले.

Copy