पत्नीच्या डोहाळे जेवणाच्या दिवशीच बोदवडच्या तरुणाची आत्महत्या

0

बोदवड- शहरातील शिवद्वार जवळील रहिवासी प्रवीण सुरेश हजारे (26) याने बुधवारी सकाळी आठ वाजेच्या सुमारास राहत्या घरात बेडशीटच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण कळू शकले नसलेतरी बुधवारी मयत प्रवीण यांच्या पत्नीच्या डोहाळे जेवणाचा कार्यक्रम असल्याचे सांगण्यात आले. मययाच्या पश्चात आई-वडील, पत्नी, बहिण व भाऊ असा परीवार आहे. याबाबत सुरेश हजारे यांनी बोदवड पोलिसात दिलेल्या खबरीनुसार अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली. तपास दिनकर धायडे हे करीत आहे.

Copy