पत्नीचा लग्नात दिला नाचण्यास नकार ; संतप्त पतीसह तिघा मित्रांनी केली मारहाण

यावल : लग्नात पत्नीने सोबत नाचायला नकार दिल्याच्या राग आल्याने पती सह त्यांच्या तीन मित्रांनी 20 वर्षीय विवाहितेला जबर मारहाण केली. ही घटना बुधवारी घडली. या प्रकरणी यावल पोलिसात चार जणां विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला. अंबापाणी, ता.यावल येथील रहिवासी चिन्टीबाई शेवल्या पावरा (20) या विवाहितेने दिलेल्या फिर्यादीनुसार मंगळवार, 18 मे रोजी सायंकाळी गावातील रेन्दा पावरा यांच्या मुलीचे लग्न असल्याने कार्यक्रमात पती शेवल्या रतन पावरा हे दारू पिवून तिथे नाचत होते. आपल्याला नाच, असे पतीने सांगितले मात्र आपण नाचण्यास नकार दिल्याने पतीने त्यांना शिविगाळ करीत जीवे मारण्याची धमकी दिल्याने चिन्टीबाई तेथून नातेवाईक पोया पावरा यांच्याकडे सांग्यादेव येथे गेल्या. घटनेच्या दुसर्‍या दिवशी बुधवार, 19 मे रोजी पती शेवल्या रतन पावरा, साम्या बाजर्‍या पावरा, चौधरी रतन पावरा व नादला भाया पावरा (सर्व रा.अंबापाणी) हे दारू पिऊन आले व त्यांनी चिन्टीबाई हिला लाकडी काठीने दोन्ही पायाचे पोटरीवरख, मांडीवर कंबरेवर, डोक्यावर, डाव्या हाताच्या कामेवर, मारहाण करून जबर जखमी केले. नागरीकांनी भांडण सोडवत जखमी विवाहितेला रुग्णालयात दाखल केले व गुरूवारी रात्री उशीरा या चौघांविरूध्द जबर मारहाण केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास हवालदार युनूस तडवी करीत आहेत.