पत्नीचा खून करुन दारुड्या फरार

0

चोपडा । सातपुड्यातील अतिदुर्गम भागातील मेलाणे येथील ज्योतीबाई भावसिंग पावरा (37) या आदिवासी महिलेचा तिच्या पतीने दारुच्या नशेत मारहाण करीत मान पिळून खुन केल्यानंतर तो फरार झाला आहे. मेलाणे गावात सर्व आदिवासी राहतात भावसिंग डोंगरसिंग पावराला दारुचे व्यसन होते तो नेहमी नशेत पत्नीशी भांडण करायाचा काल रात्री नशेत पत्नी ज्योतीबाई पावराशी त्याचे जोरात भांडण सुरू होते.

पत्नीला लाकडाच्या दांड्यााने मारहाण करीत तिची मान पिळून खुन करून तो मध्यप्रदेशमध्ये फरार झाला शिवाजी भुंगा पावरा यांच्या फिर्यादीवरुन चोपडा ग्रामीण पोलीसात भावसिंग पावराविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला तपास सपोनि केवलसिंग पावरा करीत आहेत मृत महिलेचे चोपडा उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करून शव नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले.