Private Advt

पतीसमोर नराधमांचा विवाहितेवर रेल्वे स्थानकावर सामूहिक अत्याचार : या राज्यातील घटना

नवी दिल्ली : देशातील अत्याचाराच्या थांबायला तयार नाहीत. बस नसल्याने रेल्वे प्लॅटफार्मवर झोपलेल्या दाम्पत्याला धमकावून नराधमांनी विवाहितेवर पती व मुलांसमक्ष अत्याचार केला. आंध्र प्रदेशातील प्रकाशम जिल्ह्यातील रेपल्ले रेल्वे स्थानकावर ही घटना घडली. पोलिसांनी या प्रकरणी तिघांना अटक केली आहे.

पैसे लूटलेही नराधमांनी
यारागोंडा भागातील एक महिला आपल्या पती आणि मुलांसह रात्री 11.30 वाजता रेपल्ले रेल्वे स्थानकावर ट्रेनमधून खाली उतरली. मध्यरात्रीची वेळ असल्यामुळे त्यांना रेल्वे स्थानकातून नागाईलंकाला जाण्यासाठी एकही बस मिळू शकली नाही, त्यामुळे रेल्वे स्थानक सुरक्षित असल्याचे समजून ते प्लॅटफॉर्मवरील बाकावर झोपले. ते मजुरीचे काम करतात. रात्री एक वाजता दारूच्या नशेत तिघेजण त्याच्याजवळ आले. त्यांनी आधी पीडितेकडील 750 रुपये हिसकावून घेतले. त्यानंतर महिलेच्या पतीला बेदम मारहाण केली आणि महिलेला तिच्या केसांनी ओढत नेऊन तिच्यावर बलात्कार केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिस येण्यापूर्वीच नराधम पसार
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती आरोपींकडे मदतीची याचना करत होता. घटनेच्या वेळी प्लॅटफॉर्मवर इतर दोन महिलाही होत्या, त्यांनीही मदत करण्यास नकार दिला. त्यानंतर पतीने स्टेशनबाहेर धाव घेतली, काही अंतरावर असलेल्या पोलास चौकीत जाऊन पोलिसांची मदत घेतली, पोलिस त्याच्यासोबत रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्मवर पोहोचेपर्यंत तिन्ही आरोपी फरार झाले.

तिन्ही आरोपींना अटक
पोलीस अधीक्षकांनी दिलेल्या माहितीनुसार, पोलिसांनी गुन्हा दाखल करून श्वानपथकाच्या मदतीने काही तासांतच तिन्ही आरोपींना ताब्यात घेतलं. आरोपी विजयकृष्ण (24), दुसरा आरोपी निखिल (25) अशी आरोपींची नावे आहेत. तिसरा आरोपी अल्पवयीन असून त्याच्यावर यापूर्वीही चोरीचे गुन्हे दाखल आहेत. या तिन्ही आरोपींनी पीडितेच्या कुटुंबाला मारहाण करून महिलेवर सामूहिक बलात्कार केला.