पतीच्या हातावर तुरी देत पत्नीचा पाचव्या दिवशीच पोबारा

0

जळगाव । शहरातील रामनगर येथील चोविस वर्षीय तरुणाचे नुकतेच 29 एप्रिल रोजी धार्मीक रितीरीवाजा नुसार विवाह झाला. लग्न लावुन देणार्‍या मध्यस्थी महिला, मुलीचा मामा-आई अशांनी सर्वांसमक्ष दोन घेत धुमधडाक्यात लग्न लावुन दिले. आणि अवघ्या पाचव्या दिवशी पहाटे पाच वाजता अंघोळीचा बहाणा करुन खालच्या मजल्यावर आलेल्या पत्नीने पतीच्या हातावर तुरी देत पोबारा केल्याची घटना शुक्रवार(ता.5) रोजी घडली. सुनेचा शोध घेवुन थकल्यावर सिसोदीया कुटूंबीयांतर्फे पोलिसांत तक्रार देण्यात आली.

मुळ उत्तरप्रेदेश येथील रहिवासी तथा गेल्या तीस वर्षापासुन जळगावी कामानिमीत्त स्थायीक झालेले देवेंद्रसिंग सिसोदीया यांना दोन मुले आहेत. मोठा कैलास व लहान भैय्या दोघ भाऊ दाळमिल उद्योगात नोकरीला असुन बर्‍यापेैकी पगारावर कार्यरत आहे. लग्नाचे वय झाल्याने कैलासच्या लग्नासाठी सिसोदीया कुटूंबीय मुलगीचा शो घेत होते. एप्रील महिन्यात नात्याच्या एका लग्नात इंदौर येथे जाणे झाल्यावर कैलासच्या आईने मिनाबाई व सुशिला राजेंद्रसींह ठाकुर यांना मुलगी पाहण्याचे सांगीतले. दोघांनी होकार देत..सिसोदीया कुटूंबीयांचा नाव नंबर, पत्ता घेतलाच होता.अवघ्या पंधराच दिवसांनी या दोघा महिलांनी कैलास च्या घरी फोन करुन आम्ही मुलगी घेवुन येतोय असे सांगतीले. 26 एप्रील रोजी खासगी गाडी भरुन आलेल्या महिला व पुरुषांनी मुलगी म्हणुन सोनु मनोहर धुर्वे हिला दाखवत आत्ताच लग्न लावून टाका..असे म्हणत घाई केली. मुलगी सोबत तिची आई सुनंदा, मामा दिपक राठोड, मावशी शितल प्रवीण शिंदे, मावसा अशा नातेवाईंकाच्या उपस्थीतीत रामनगरातच 29 एप्रील रोजी लग्न लागले. लग्न होण्यापुर्वी शंभर रुपयांच्या स्टॅम्प पेपरवर मुलगी सोनू मनोहर धुर्वे हिच्या कडून संमतीपत्र लिहून घेण्यात येवुन लग्नाचा विधी उरकण्यात आला.

सोनू धुर्वे हिचे कैलास सिसोदीया याच्याशी विवाह झाल्यावर सिसोदीया कुटूंबीयांनी नवदाम्प्यासाठी वरच्या मजल्यावर झोपण्याची सोय केली होती. चार पाच दिवस व्यवस्थीत सर्व काही सुरु होते.नवदाम्पत्याची हळदही फिटली नाही तोवर पाचव्याच दिवशी 5 रोजी नववधुला पहाटे पाच वाजता तहान लागल्याने ती, नवर्‍याला उठवुन त्यासोबत खाली आली. कैलासने घर उघडले फ्रिजमधुन पाणी काढून दिले. नंतर तीने..तुम्ही झोपा मी अंघोळ करते असे सांगुन कैलास वर पाठवुन दिले. घरातुन बॅग व अंगावरील दागने घेवुन धुम ठोकली.