पतसंस्थेने उद्योजकता वाढविण्याचे काम करावे-बबन भेगडे

0

तळेगाव : सहकार क्षेत्रातील काम लोकशाही मार्गाने व्हावे. यामध्ये संस्थेनी सभासदाचे हित लक्षात घेतले पाहिजे. सहकारातून सर्वसामान्य कर्जदार हा उद्योजक झाला पाहिजे, असे प्रतिपादन पुणे पीपल्स बँकेचे अध्यक्ष बबनराव भेगडे यांनी केले. आमदार कृष्णराव भेगडे नागरी सहकारी पतसंस्थेच्या 20व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत अध्यक्षस्थानावरून बबनराव भेगडे बोलत होते. यावेळी माजी आमदार कृष्णराव भेगडे, सहाय्यक निबंधक विठ्ठल सूर्यवंशी, पुणे जिल्हा बँकेच्या उपाध्यक्षा अर्चना घारे, नगराध्यक्षा चित्रा जगनाडे, संस्थापक बापूसाहेब भेगडे, नूतन महाराष्ट्र विद्या प्रसारक मंडळाचे सचिव संतोष खांडगे, माजी नगराध्यक्ष सुरेश धोत्रे, बाळासाहेब जांभूळकर, निवृत्ती भेगडे, माया भेगडे, वैशाली दाभाडे, मंगल भेगडे, राजश्री म्हस्के, शबनम खान, उद्योजक राजेश म्हस्के, नंदकुमार शेलार, अध्यक्ष दीपक जाधव आदी उपस्थित होते.

यावेळी स्वातंत्रसैनिक बाळासाहेब जांभूळकर, शास्त्रज्ञ उमा मधुसूदन खळदे, नगरसेवक आनंद भेगडे, तत्परतेने कर्जफेड कारणार्‍या सभासदाचा, तसेच मोठ्या प्रमाणात दैनंदिन बचत कर्माचार्‍यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी प्रस्ताविक अध्यक्ष दीपक जाधव यांनी केले. सूत्रसंचलन अनिल धर्माधिकारी यांनी केले, तर आभार सुदाम कदम यांनी केले.

Copy