पक्षासाठी प्रत्येक कार्यकर्ता हा महत्त्वाचाच – अजित पवार

0

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक

पुणे : आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये पक्षातील कार्यकर्त्यांनी आपसातील मतभेद विसरून कामाला लागावे, असा सल्ला राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी दिला. तसेच कोणालाही आमदार म्हणत बसू नका, या आमदार, बसा आमदार, असे म्हटल्यामुळे त्याच्याही डोक्यात हवा जाते; त्याला आमदार झाल्यासारखे वाटत. त्यामुळे खरा कार्यकर्ता बाजूला पडत आहे. पक्षासाठी प्रत्येक कार्यकर्ता हा महत्त्वाचा आहे, असे पवार यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्ह्यातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची बैठक जिल्हा बँकेमध्ये पवार यांच्या उपस्थितीत नुकतीच पार पडली. याप्रसंगी पवार यांनी नेहमीच्या स्टाईलने कोपरखळ्या मारत कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. जिल्हा परिषदेचे अध्यक्ष विश्‍वासराव देवकाते, पक्षाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप गारटकर, जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे अध्यक्ष रमेश थोरात आणि जिल्हा दूध उत्पादक संघाचे अध्यक्ष विष्णू हिंगे यांनी जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्याचा दौरा करून कार्यकर्त्यांशी संवाद साधत त्यांच्यातील मतभेद मिटवावेत. तसेच विविध पदे भूषविली आहेत त्यांनी पक्षवाढीसाठी प्रयत्न करावेत, असे पवार यांनी यावेळी सांगितले. जिल्ह्यातील कोणत्या तालुक्यातून किती कार्यकर्ते आले आहेत, हे पाहण्यासाठी पवार यांनी कार्यकर्त्यांना हात वर करायला लावले

Copy